Nostalgia, उतारवय आणि आमचे शिक्षक

You become old when your memories are stronger than your dreams. When you spend more time in nostalgia.

माझे आणि माझ्या शाळेचे नाते हे कडू-गोड आहे. काय ती थोर शाळा, काय ते शिक्षक, काय ते दिवस…असं वाटून उगाच हुंदका येणाऱ्यातला मी नाही.

तरीही जेव्हा मी अचानक हा व्हिडीओ Youtube वर पाहिला तेव्हा तो पूर्ण पाहण्याचा आणि शाळेतल्या मित्रांना पाठवण्याचा मोह आवरला नाही.

हे दोघे शिक्षक माझ्या शाळेत म्हणजे रमणबाग मध्ये मी ५-१० मध्ये असताना होते.

भालचंद्र पुरंदरे सर हे बाबासाहेब पुरंदरे यांचे पुतणे आणि शास्र, गणित या विषयांसह नाटक बसवण्यातही आघाडीवर असायचे. मी आयुष्यात ज्या एकमेव नाटकात फुटकळ काम केलं त्याचं लेखन, दिग्दर्शन त्यांनीच केलं होतं. शिकवण्याच्या बाबतीत तसे सुमारच होते, बाकीच्या (काही तुरळक अपवाद वगळता) सुमार शिक्षकांप्रमाणेच. सगळे संघोटे होते, आणि ती घाणेरडी विचरसरणी लहान मुलांवर शिक्षकाच्या भूमिकेतून बिंबवायचे काम करायचे हा माझा मुख्य आक्षेप आणि राग…

दुसरे अजय पराड सर हे आमचे संगीत शिक्षक. मला संगीताची आवड असूनही आणि थोडीफार शिकण्याची क्षमता असतानाही मी संगीतात रूची न दाखवण्याचं कारण म्हणजे पराड सर. त्याविषयी जास्तं काही सांगणार नाही.

पण तरीही शाळा सोडून (जवळ जवळ) ३० वर्ष (१९९५ मध्ये १० वी) झाल्यावर अचानक हा व्हिडीओ पाहिल्यावर बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या.

उतारवय सुरू झाल्याचे हे अजून एक लक्षण…असो.

👇 हा आमचा पुरंदरे सरांनी बसवलेल्या नाटकाच्या चमूचा फोटो

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑