डॉ. शंतनू अभ्यंकर हे वाई मधील सुप्रसिद्ध डॉक्टर आणि एक विवेकवादी विचारवंत आणि लेखक होते. नुकतेच त्यांचे 15ऑगस्ट 2024 ला कर्करोगाने निधन झाले.
त्यांच्या मुलाखतीचा एक ब्लॉग मी इथे पूर्वी लिहिला होता.
1-2 वर्षांपूर्वी ते कर्करोगातून बरे झाले होते, त्यावेळी त्यांनी “आपुले मरण पाहिले म्या डोळा” नावाचा लेख लिहिला होता. त्यांची लिहायची, बोलायची शैली साधी सोपी आणि नर्मविनोदी होती. ते नास्तिक होते आणि परखड मत द्यायला मागेपुढे बघायचे नाहीत.
गेल्या वर्षी पुन्हा रोग बळावला आणि केवळ 60 व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या Youtube वर अनेक मुलाखती, भाषणे उपलब्ध आहेत, पण त्यातली 2 मला इथे शेअर करावीशी वाटली. नक्की बघा/ ऐका आणि विचार करा…
👇 ह्या भाषणाचे शीर्षक इंग्रजीत असले तरी पूर्ण भाषण मराठीच आहे

Leave a comment