गणपती बाप्पा मोरया…
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मला स्वतःला गणपती उत्सव लाभत नाही असा माझा अनुभव आहे. अनेक वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशीच, किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे काही वाईट, त्रासदायक प्रसंग माझ्या आयुष्यात घडले आहेत, किंवा घडतात. हे वर्षही त्याला अपवाद नव्हते. त्याबद्दल लवकरच वेगळ्या ब्लॉग मध्ये लिहीन.
पण असे असले तरी मला गणपती देवता, तो फॉर्म खूप आवडतो!
मुलीच्या गणपती च्या चित्रपासून स्फूर्ती घेऊन मीपण काही तरी काढायचा प्रयत्न केला…मला खूप मजा आली!




मला चित्रकला आणि संगीत फॉर्मली शिकायला आवडेल, तसंच एखादी परदेशी भाषा सुद्धा…
बरंच काही करायची इच्छा आहे… ह्या वर्षी अगदी बेसिक सुरुवात ही होत आहे… बघू काय काय आणि कुठवर जमतंय…

Leave a comment