Making of “हम आपके है कौन…!”

मी चित्रपट पाहायला लागलो साधारण १९८५ पासून…असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपट तेव्हापासून पाहिले आहेत. हिंदी मध्ये मला अतिशय आवडलेले (माझ्या काळात प्रदर्शित झालेले) २ चित्रपट म्हणजे अंदाज अपना अपना आणि हम आपके है कौन…?

विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटात सलमान खान आहे आणि दोन्ही १९९४ मध्ये (मी १० वी इयत्तेत असताना) प्रदर्शित झाले. अंदाज अपना अपना १५ नोव्हेंबरला आला, जो त्या वेळेस तितकासा चालला नाही, कारण “हम आपके है कौन”…जो ५ ॲागस्ट १९९४ ला प्रदर्शित झाला आणि तुफान लोकप्रिय झाला. मी स्वतः ५ वेळा चित्रपटगृहात बघितला.

मला सूरज बडजात्या व्यक्ती म्हणून खूपच आवडतो, तितकाच त्याच्या प्रकृतीचा सिनेमाही…सलमान खान हा त्याच्या सिनेमात नेहेमीच वेगळा, साधा आणि सच्चा वाटतो! मी त्यांचा प्रेम रतन धन पायो एकट्यानी अहमदाबादला पाहिला होता! असो.

Hum Aapke Hai Koun…! या चित्रपटाची वैशिष्ट्यं परत एकदा बघायची असतील तर Making of Hum Aapke Hai Koun…! ही documentary नक्की बघा.

माझ्यासाठी तरी कायमच हा चित्रपट स्पेशल असेल…

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑