ह्रृदयनाथ मंगेशकर यांच्या लता मंगेशकरांच्या आठवणी आणि माझे मत

नुकतेच मी ह्रृदयनाथ मंगेशकर यांच्या लता मंगेशकरांच्या आठवणींची दीर्घ मुलाखत ABP माझा वर पाहिली. २ भागांतली ही मुलाखत मला आवडली. मंगेशकर family बद्दलचे माझे मत कालपरत्वे बदलत गेले आहे. एके काळी निस्सिम चाहता होतो, ते त्यांच्या संगीतातल्या योगदानामुळे. ते योगदान अजूनही मान्यच आहे. पण पुढे त्यांचे राजकीय विचार, आपल्या लाडक्या “दैवतांचा” उदोउदो करायची पद्धत, बऱ्याच प्रमाणातला आत्मकेंद्रीपणा, प्रौढी याचा राग यायला लागला.

लता मंगेशकरांनी मोदीचं उघड कौतुक केल्यावर मनातून पूर्ण उतरल्या. त्यांची गाणी आणि त्या व्यक्ती म्हणून यांच्यात दुरावा झाला आणि गाणी एक product, एक utility/service म्हणून ऐकत राहिलो…व्यक्ती म्हणून राग यायला लागला.

ह्रृदयनाथ यांच्याबद्दल तीच गत. सावरकरांचा अति उदोउदो, दैवतीकरण, संघोट्या वृत्तीशी जवळीक यांचा उबग आला.

माझी त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्यासारख्या लोकांबद्दल एक theory आहे. जी माणसं लहानपणी प्रचंड गरीबी, अवहेलना, अपमान सहन करत त्यांचा मानीपणा जपतात, आणि थोर होतात, ती माणसं जन्मभर bitter राहतात. वरकरणीचा चांगूलपणा किंवा अगदी genuine चांगूलपणा काही प्रसंगी कोलमडून पडतो आणि आतला अनेक वर्षे दबलेला राग, चिडचिड बाहेर येते. अशी माणसं पूर्णपणे heal होत नाहीत.

असो. मुलाखत चांगली आहे…काही कृत्रिम, नंतर सुचलेल्या आठवणी वाटतात, पण बऱ्याच प्रमाणात चांगली आहे.

पण आजच हृदयनाथ यांचा सकाळ मध्ये “ताजमहल” नावाचा एक दीर्घ लेख प्रसिद्ध झाला आहे, तो वाचून परत त्यांचा प्रचंड राग आला. बिनडोक पु. ना. ओकांच्या “ताजमहल नाही तेजोमहल” पुस्तकाचे दाखले देत ताजमहालाविषयी प्रचारकी लेखन करणे…ताजमहाल पेक्षा आपला महाराष्ट्र, राजगड भारी वगैरे बावळट तुलना ह्या वयात करणे ह्यावरून एक मत परत दृढ झालेः एकादा माणूस एखाद्या बाबतीत प्रचंड थोर, कर्तृत्ववान आहे म्हणून सगळ्या क्षेत्रातच त्याला अक्कल असते, किंवा त्याचं इतर बाबतीतलं मत गंभीरपणे घ्यायला हवे असे नाही.

सकाळ मधला लेख इथे वाचू शकताः

आणि मुलाखत इथेः

भाग १
भाग २

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑