गेल्या काही वर्षात मी दोन विषयांचा जास्त सखोल अभ्यास केला आहे, किंवा त्या विषयांची आवड निर्माण झाली आहे – एक फायनान्स/अर्थशास्त्र आणि दुसरा तत्वज्ञान.
तत्वज्ञान या विषयाची आवड मला अगदी लहानपणापासून आहे. आणि त्याबद्दल बऱ्यापैकी वाचन केले आहे…सुरुवातीची काही वर्षे मराठीत आणि नंतर इंग्रजीत.
त्यातून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे तत्वज्ञान आणि दुःख याचे खूप जवळचे नाते आहे. बरेचसे तत्वज्ञान हे वाईट प्रसंगातून, दुःखद घटनांमधून जास्त चांगले समजते.
“We mature with the damage, not with years…”

सध्या मी ते अनुभवतोय…Mature होण्यासाठीची खूप मोठी किंमत आहे.
बऱ्याच गोष्टींची नव्याने जाणीव होते आहे; स्वतःबद्दच्या गोष्टी असतील किंवा इतरांच्या.
जॉब interview मध्ये “number of years of experience” सगळेच विचारतात, पण काही चतुर, विचारी लोकं “number of unique experiences per year” किती ते विचारतात. त्यामागाचा विचार ही तोच आहे.
अनुभव हा वर्षांच्या लांबीनुसार ठरत नाही. तुम्ही 25 वर्षं लिफ्टमन म्हणून काम केलं तर 25 वर्षानंतरही नवीन काहीच शिकलेलं, साठवलेलं नसतं. याचं कारण तुम्ही एकच अनुभव वारंवार जगात असता. अनुभव हा वैविध्यावरून ठरतो. “आनंद” चित्रपटातला आनंद म्हणजे राजेश खन्ना म्हणतो: “बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही”.
Quality over quantity हाच त्यामागचा विचार असतो.
प्रगल्भता (Maturity) ही अनुभवाच्या दर्जातून (quality of experience) येते.
आणि अनुभव हा जास्त करून कटू, वाईट प्रसंगातून (failure, setback) येतो. जेव्हा सगळं चांगलं होत असतं, मनासारखं होत असतं तेव्हा आपण त्यातून जास्त शिकत नाही. जेव्हा अपयश येतं, दुःख वाट्याला येतं तेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो, शिकतो, mature होतो.
The great Sufi poet Rumi said: “The wound is the place where the light enters you”.
त्याचा पूर्ण विचार जास्त समर्पक आहे, तो असा:
I said: What about my eyes?
He said: Keep them on the road.
I said: What about my passion?
He said: Keep it burning.
I said: What about my heart?
He said: Tell me what you hold inside it?
I said: Pain and Sorrow
He said: Stay with it. The wound is the place where the Light enters you. “
सध्याच्या दुःखातून सावरताना मला दोन गोष्टींचा आधार वाटतो – एक म्हणजे तत्वज्ञान आणि दुसरा विनोद.
तत्वज्ञान, दुःख आणि विनोद यांचा देखील खूप जवळचा संबंध आहेच.
Life is a tragedy for those who feel. And a comedy for those who think.
किंवा चार्ली चॅप्लिन म्हणाला त्याप्रमाणे:
Life is a tragedy when seen in close-up, but a comedy in long-shot.

Leave a comment