श्रीधर फडके चे “तू माझ्या आयुष्याची पहाट” ऐकताना आणि जुन्या इमेल वाचताना ही पोस्ट करावीशी वाटली.
गहिवरून येणे, रडावेसे वाटणे, हळवे होणे या गोष्टी सध्या अचानकच घडतात. प्रत्यक्ष रडणे हे कृती म्हणून वेगळे आणि भावनांचा कडेलोट म्हणून तसे वाटणे हे वेगळे.
हल्ली मधेच अपरात्री, पहाटे जाग येते. मग बाबांच्या आठवणी… मग कोणाशी तरी बोलावंसं वाटतं… म्हणजे soul mate शी. मग जुन्या आठवणी जाग्या होतात… केल्या जातात.
परवा soul mate शी सुरुवातीचा पत्राव्यवहार, म्हणजे soul mate बनण्याच्या प्रक्रियेला कारणीभूत असलेल्या इमेल आणि चॅट वाचत बसलो होतो…
हल्ली मला फोटो पेक्षा पत्र जवळचं वाटतं. म्हातारं होत चालल्याचं लक्षण असेल किंवा मोबाईल च्या जमान्यात फोटो, व्हिडीओ, सेल्फी यांमुळे भावना, संवेदना या दृश्य माध्यमाला विटल्या असतील. पण इमेल, पत्र खूप छान, जवळची आणि जिवंत वाटतात. त्यातला मजकूर कसाही असला (आनंदी, दुःखद वगैरे) तरी ते परत वाचून त्या आठवणी पुन्हा जगण्यात बरं वाटतं… शांत वाटतं.
श्रीधर फडके ची Spotify वर एक playlist बनवली आहे. त्याची गाणी माझ्या आत्ताच्या मानसिक अवस्थेला चांगली, पोषक, समर्पक आहेत. गंमत म्हणजे जुन्या इमेल मध्ये soul mate शी ज्या गोष्टींमुळे कनेक्ट झालो त्यात श्रीधर फडके ची गाणी होती. आता घरी सुद्धा सतत ऐकवत असल्यामुळे असेल किंवा आडनाव भगिनी असल्यामुळे असेल, पण ती गाणी आवडायला लागली आहेत!
तुम्ही पण एकदा ऐकून बघा…आणि आवडली तर नक्की सांगा…
बहुदा श्रीधर फडके ची playlist बनवणारा आणि ती गाणी ऐकण्याची शिफारस करणारा मी एकटाच असेन. किंवा ती…जर आवड बदलली नसेल तर. शेवटी आपण ज्यांच्या सहवासात राहतो त्यांचा आपल्या आवडी-निवडीवर प्रभाव पडतोच… आणि आपल्या लाईफ पार्टनर चा जरा जास्तच.




Leave a comment