काल आणि परवा घरी Indian Idol बघत होतो. मी एकटाच…कारण बाकीच्यांना तितकासा interest नव्हता. नेमके चांगले गाणे चालू असताना फोन, एकमेकांच्यात गप्पा, बडबड यामुळे माझी चिडचिड झाली आणि मी तसे बोलून दाखवल्यावर साहजिकच थोडे भांडण, उत्तराला प्रत्युत्तर झाले.
त्यानंतर सगळे शांत…आणि मी एकटाच TV समोर बसून उर्वरीत कार्यक्रम बघत होतो.
तेव्हा अचानक मला दोन व्यक्तींची तीव्र आठवण झाली. एका व्यक्तीला काळाने माझ्यापासून हिरावले तर दुसऱ्या व्यक्तीला परिस्थितीने…
दोन्ही व्यक्तींशीही संगीत आणि इतर अनेक विषयांवर इतकं छान ट्युनिंग होतं की अजूनही बरेचदा काही चांगलं ऐकलं, पाहिलं की पटकन ते share करायचा मोह होतो.
काल, परवा पाऊस पडत असताना देखील तेच घडले. खूप काही बोलायचा, गप्पा मारायचा मूड असतो. पण… फक्त आठवणीतला पाऊस आणि आठवणीतली गाणी.
असो.
ह्या वेळचे Indian Idol मी सुरुवातीपासून बघत आहे. आत्तापर्यंत तरी चांगले वाटले. सध्या बऱ्याच गोष्टी करायच्या असं ठरवूनही वेळ मिळत नाहीये. पण त्यातल्या त्यात प्रयत्न करून काही निवडक activity चालू केल्या आहेत हेच समाधान.
आत्ता एवढंच.

Leave a comment