पुन्हा ब्लॉग सुरु …

आज अनेक महिन्यांनी मी हा ब्लॊग पुन्हा जिवंत केला. मागचे एक वर्ष मला खूप शिकून खूप म्मोठ्ठे व्हायचे असल्यामुळे (MBA करत होतो ना!) मी ब्लॊगिंग पासून दूर होतो…पण सध्या घरी पडीक असल्यामुळे परत काही तरी लिहावे असे वाटायला लागले.

सध्या जॊब शोधता शोधता इतर वेळेस घरातली कामे ही करावी लागत आहेत. उदा. दळण टाकणे, बॆन्केत चेक भरणे, आजीची औषधे आणणे 😦

त्यामुळे माझ्या MBA चा सगळ्यात जास्त उपयोग आईला होतो आहे!
असो…कोणाला तरी उपयोग होतो आहे ना…तुका म्हणे त्यातल्या त्यात…!

पुण्यात लवकरच Commonwealth Youth Games होत आहेत, तिथे traffic volunteer चे काम का करत नाही असा एक मित्राने (?) अनाहूत सल्ला दिला…त्याचा राग व्यक्त करण्या आधिच दुसऱ्या मित्राने अजुन एक खपली काढली…म्हणाला, “तिथे ही तू reject होशील …त्यापेक्षा games चा mascot म्हणून उभा रहा दारात…लोकांची करमणूक तरी करशील, आणि तू जास्त make-up न करता ही mascot दिसशील…”

असो… “वाईट दिवस चालले असता वाघाला ही लोक शेळी सारखे वागवतात” – जंगलातील जुनी म्हण!
फक्त माझे दुर्दैव असे आहे की माझे वाईट दिवस कायमच चालू असतात…बारमाही “साडेसाती” आहे मला…

चला, आईनी हाक मारली, बहुतेक २३ व्या मावशीला ३७ वा निरोप पोचवायचा असणार…फोनच्या जमान्यातही आमच्याकडे निरोप अजून असे प्रत्यक्ष माणसे पाठवूनच पोचवले जातात…ऐकावे ते नवलच नाही…!

~ कौस्तुभ

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑