वेब सिरीज हा प्रकार तसा नवा आहे, पण क्रिएटिव्ह लोकांसाठी तो खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे… म्हणजे ज्यांना स्टुडिओ, प्रॉडक्शन हाऊस, टीआरपी वगैरे बंधनामुळे ज्या गोष्टी, जे प्रयोग टीव्ही वर करता येत नाहीत ते वेब सिरीज मध्ये करता येतात.
ऍमेझॉन, नेटफ्लिक्स हे आता खूप मोठ्या स्केलवर एक्सक्लुसिव वेब कन्टेन्ट मोठ्या प्रमाणावर बनवायला लागले आहेत. आपल्याकडे AIB वगैरे काही निवडक ग्रुपनी वेब सिरीज मध्ये जम बसवला आहे. पण मराठी मध्ये असे प्रयोग नसतील…असं आत्तापर्यंत वाटत होतं.
पण नुकतीच अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांची “भारतीय डिजिटल पार्टी” उर्फ “भाडीपा” ह्या बॅनर खाली बनवलेल्या “कास्टिंग काऊच” ह्या वेब सिरीज चे काही भाग बघितले. २-३ भाग छान जमून आले आहेत, काही अगदीच ओढूनताणून केले आहेत किंवा फसले आहेत…पण एकूणच प्रयोग नाविन्यपूर्ण आणि स्तुत्य आहे!
मला आवडलेले २-३ एपिसोड इथे शेअर करत आहे
Ajay-Atul
Radhika Apte
Mithila Palkar