लता मंगेशकर यांच्या काही दुर्मिळ आणि चांगल्या मुलाखती

लता मंगेशकर यांना जाऊन उद्या एक आठवडा होईल. गेल्या ६-७ दिवसात त्यांना श्रद्धांजली वाहणारे, आठवणी जागवणारे अनेक लेख मी वाचले. पण कशानेही समाधान झाले नाही. कारण ते लेख लिहिणारी मंडळी बेताची, सुमार किंवा आत्मप्रौढी मिरवणारी होती. बऱ्याचशा लेखांत स्वतःची टिमकी वाजवणे, किंवा भाराभर गाण्यांची यादी आणि सनावळी देणे किंवा उगाच आचरट उपमा, रूपक, कृत्रिम आणि तकलादू शब्दप्रयोग यावरच भर दिसला. 

लता मंगेशकर यांच्यावरचे अनेक उत्तमोत्तम लेख/व्यक्तिचित्रं मी वाचली आहेत. त्यांत पुलं, शांता शेळके, विजय तेंडुलकर, सुधीर मोघे यांनी लिहिलेले लेख अप्रतिम आहेत!  हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले या घराच्या मंडळींनी लिहिलेले काही लेख साहित्यिक दृष्ट्या उच्च नसले तरी घराच्या लोकांच्या नजरेतून म्हणून वेगळे आणि चांगले आहेत. पण बाकी सुधीर गाडगीळ, शिरीष कणेकर, अच्युत गोडबोले छाप मंडळींचे लेख म्हणजे फालतूपणा असतो. कणेकर तर टीव्ही वर श्रद्धांजली वाहतानाही पाचकळपणा करत होता (स्वतः ८० च्या उंबरठ्यावर असून अजून आचरटपणा आणि आगाऊपणा कमी झालेला नाही). बाकी सचिन तेंडुलकर, किंवा अशा लोकांचे लेख म्हणजे कोणी तरी दुसऱ्यांनी शब्दांकन केलेले, ठिगळं लावलेले गाठोडे असते.

त्यामुळे असले लेख वाचण्यापेक्षा लता मंगेशकर यांच्यावरचे जुने दर्जेदार लेखन पुन्हा वाचणे कधीही चांगले. तसेच त्यांची जुनी गाणी ऐकणे आणि मुलाखती पाहणे… 

जरा मेहनत घ्यायची तयारी असेल तर Youtube वर अनेक उत्तमोत्तम चॅनेल उपलब्ध आहेत. दूरदर्शन सह्याद्री, आकाशवाणी पुणे, स्वतः लता मंगेशकर यांच्या नावाने असलेला एक चॅनेल , Rare Indian Classical Music Programs हे आवर्जून बघावेत. अजूनही काही तुरळक व्हिडीओ आहेत. ह्याच चॅनेल वरील किंवा इतर एखाद-दुसऱ्या ठिकाणचे काही चांगले विडिओ इथे share करत आहे. त्यात भर घालण्याजोगे अजून काही असतील तर नक्की सांगा म्हणजे मी हीच पोस्ट अपडेट करून आपल्या श्रेयनामावलीसहीत ते व्हिडीओ पोस्ट करेन. 

#LataMangeshkar #Lata #Mangeshkar

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑