उत्कट-बित्कट होऊ नये — संदीप खरे


मी आधी म्हटल्याप्रमाणे अधूनमधून मला आवडलेल्या कविता इथे पोस्ट करत जाईन… नुकतेच मला संदीप खरे ह्याच्या कवितांचे कलेक्शन एकाने फॊरवर्ड केले…त्यातलीच ही एक कविता.

बरेच दिवसात ’आयूष्यावर बोलू काही’ ला गेलो नाही, त्यामुळे मला तरी ही कविता नवीनच आहे…

==========================================


उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥

~ संदीप खरे

6 thoughts on “उत्कट-बित्कट होऊ नये — संदीप खरे

Add yours

Leave a reply to archana Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑