ओबामा, नोबेल, भारतरत्न आणि माध्यमे


ओबामाला २००९ साठीचा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. आणि त्यावर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या …बऱ्याचश्या टीका/ आक्षेप, काही आनंद व्यक्त करणाऱ्या. बहुतेकांच्या मते हा पुरस्कार ओबामाला देण्यात थोडी घाईच झाली…कदाचित तो त्याच्या आश्वासनांची पूर्ती करतो का ते पाहून अजून काही काळाने हा पुरस्कार देता येऊ शकला असता.


आपल्या वर्तमानपत्रात आणि मिडियामध्ये पण यावर बरीच चर्चा झाली…पण ते फक्त विशिष्ट लोकांपुरतेच मर्यादीत असते…बाकीच्या लोकांना त्याच्याशी फारसे घेणेदेणे नसते.


परवाच आमच्या ओळखिची एक बाई तिच्या दंगा करणाऱ्या ८-९ वर्षाच्या मुलाला समजावून सांगत होती: ’असा दंगा नाही करायचा बाळा, शांत बसलं ना की लोकं शाबासकी देतात, बक्षीस देतात…तो ओबामा बघ…शांत बसल्याबद्दल त्याला केवढा मोठ्ठा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला…मग, बसणार ना शांत आता?’


’बाळा’ नी पूर्ण दुर्लक्ष करून त्याला जे करायचे होते तेच ह्केले…पण मला शांत बसण्याबद्दल हे असे ’incentive’ पाहून गंमत वाटली…


पण कुणी सांगावे, त्या नोबेल कमिटी सुद्धा कदाचित असाच विचार केला असेल…म्हणजे आधीच्या जॊर्ज बुश पेक्षा ओबामा “बराच शांत” आहे…अध्यक्ष होऊन ८-१० महीने झाले तरी अजून एकही नवीन युद्ध सुरु केले नाही…आणि तसे काही करायच्या आतच त्याला नोबेल देऊन टाका…म्हणजे एक जबाबदारी म्हणून तरी तो असे काही करणार नाही!


अन्यथा, ओबामानी असे अजून काहीच केले नाहीये ज्यामुळे त्याचा नोबेल साठी नुसता विचार सुद्धा केला जाऊ शकतो. एक तर नोबेल ला नामांकन द्यायची मुदत ही तो अध्यक्ष झाल्यानंतर केवळ २ महिन्यांनी होती, म्हणजे आत्ताइतके ८-१० महिनेही नाही…केवळ २ महीने. त्यामुळे त्याला नोबेल देणे ह्यात राजकीय विचारच जास्त आहे असे वाटते.


पण आपल्याकडच्या मिडियानी ह्याची दखल घेऊन चर्चा करावी याचे मात्र मला फार आश्चर्य वाटले. नुकतेच मी ’भारतरत्न’ पुरस्कारांवरचे एक चांगले आणि माहितीपूर्ण पुस्तक वाचले. भारतरत्न पुरस्कारातही अनेक वादग्रस्त विजेते आहेत हे बऱ्याच लोकांना माहितीच नसते. आणि आपल्याकडचे विचारवंत, व्रुत्तपत्रे ई. त्यावर कधी बोलताना, टीका करतानाही दिसत नाहीत.


कदाचित ओबामावर टीका करणे सोप्पे असेल कारण त्याचा ह्या टीकाकारांना काही त्रास होणार नाही, आणि ओबामाला तर नाहीच नाहे! पण तेच इथल्या राजकीय पक्षांवर, नेत्यांवर टीका करणे म्हणजे उगाच आपला ’पोटापाण्याचा’ धंदा बंद पडायचा…असा सोप्पा विचार ही मंडळी करत असणार. त्यामुळे कोणी त्या विषयावर जास्त बोलायला धजावत नसेल.


राजीव गांधी, एम. जी. रामचंद्रन या आणि अशा लोकांना जेव्हा भारतरत्न दिले गेले तेव्हा त्याबद्दल चर्चा, वाद व्हायला पाहिजे होते…असे का केले याचे स्पष्टीकरण सरकारला द्यायला भाग पाडायला पाहिजे होते. पण तसे झाले नाही. राजीव गांधी यांना तर ’भारतरत्न’ का दिले हे मला अजून समजलेले नाही. १९८० साली ते (अनिच्छेनीच) राजकारणात आले…१९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येबद्दलच्या सहानुभूतीमुळे पंतप्रधान बनले…लगेच १९८५ साली त्याच सहानुभूतीचा फायदा घेऊन विक्रमी संख्येनी त्यांच

2 thoughts on “ओबामा, नोबेल, भारतरत्न आणि माध्यमे

Add yours

Leave a reply to Raj Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑