बँकेकडून लोन SANCTION झालं. मॅनेजरनं डीडी हातात धरून माझ्यापुढं हात केला..
.
.
मी कृतज्ञतेनं त्यांना मराठीत म्हटलं : “मी तुमचे ऋण कधीच फेडू शकणार नाही.”
.
.
मॅनेजरने डीडी परत ड्रॉवरमध्ये ठेवला.
😂😂
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🐋🐳🐬🐟🐋🐳🐬🦈
मराठी भाषेचा शृंगार😅
‘मासा’ आणि ‘माशी’ यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही; पण शब्दांची गंमत अशी की ‘माशाला’ स्रीलिंगी शब्द नाही आणि ‘माशीला’ पुल्लिंगी शब्द नाही……
त्यातही गंमत अशी, की हे दोघंही कोळ्याच्या जाळ्यात अडकतात. पण त्या दोन्ही ‘कोळ्यांचा’ एकमेकांशी कांहीही संबंध नाही…..
याशिवाय आणखी एक गंमत म्हणजे ‘माशाची’ आमटी आवडीने खाणारे आमटीत माशी पडली तर आमटी फेकून देतात.
🦈 🦗
😂😂😂😂
मराठीला जी “मज्जा संस्था” वाटते ती इंग्रजीला “नर्व्हस सिस्टीम” वाटते. दृष्टीकोनातला फरक दुसरं काय?😄
— पु. ल. देशपांडे

Leave a Reply