वाढदिवस आणि संस्कृत

नुकताच मुलीचा वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या 1 आठवडा आधीपासूनच तिने “आता मला कोणी रागवायचं नाही. फक्त लाड करायचे” असं जाहीर केलं.

तेव्हा तिला मी शाळेत शिकलेला एक संस्कृत श्लोक सांगितला.


लालयेत् पञ्च वर्षाणि, दश वर्षाणि ताडयेत् ।
प्राप्ते तु षोडशे वर्षे, पुत्रं मित्रवदाचरेत् ॥


Translation & Meaning:
Lālayet pañca varṣāṇi: Indulge/pamper the child for the first five years.

Daśa varṣāṇi tāḍayet: Discipline/train them strictly for the next ten years (up to age 15).

Prāpte tu ṣoḍaśe varṣe: Once they reach the sixteenth year.

Putraṃ mitravadācaret: Treat them as a friend.


म्हणजे 5 ते 15 वर्षे हे फटके द्यायचं वय असतं. माझे लाड करा वगैरे चालणार नाही. असं तिला सांगितलं.

संस्कृत थोडं फार शिकल्याचा असा फायदा होईल असं जन्मात वाटलं नव्हतं!

सध्या तरी ती निरुत्तर झाली आहे. पण काही तरी डोक्यात शिजतंय असं वाटलं. जरा जपूनच रहायला लागणार!

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑