नुतकेच मी लालक्रुष्ण अडवाणी यांचे ’देश माझा, मी देशाचा’ हे आत्मचरित्र वाचले. खूप दिवसांनी एक चांगले राजकीय आत्मचरित्र वाचायला मिळाले. तसा मी संघ किंवा भाजप च्या विचारसरणीशी सहमत नाही…किंबहुना विरोधातच आहे. पण तरिही अडवाणी मला नेते म्हणून आवडतात. २००९ लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पुण्यातल्या प्रचारसभेलाही मी गेलो होतो – भाजपला मत देणार नाही ह्याची खात्री असूनही 🙂
ह्या आत्मचरित्राचा मी मराठी अनुवाद वाचला…त्यामुळे तो मूळ पुस्तका ईतका चांगला आणि नेमका आहे की नाही हे सांगता येत नाही, पण काही ठिकाणी ईंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना आशय किंवा लेखन शैलीतील गंमत/ मूळ उद्देश हरवला आहे की काय असा संशय येतो…पण असे किरकोळ प्रमाणात घडले आहे
एक ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे – जवाहरलाल नेहरु आणि महात्मा गांधी यांचा उल्लेख (चांगल्या बाबतीत) अनेकदा आला आहे…विशेषतः महात्मा गांधी यांचा, त्यांच्या विचारांचा… भाजपा आणि जनसंघाच्या अनेक नेत्यांपेक्षा खूप जास्त प्रमाणात.
अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे (खरं तर माझ्यासाठी आश्चर्यकारक!) अडवाणींचे वाचन चौफेर आहे, नुसते वाचनच नाही तर विचार ही…विरुद्ध मतप्रवाहाबद्दल नुसताच आकस बाळगणे आणि ते समजावून न घेताच टीका करणे ही रा. स्व. सं किंवा भाजप बद्दलची समजूत निदान अडवाणींना तरी लागू होत नाही…त्याचबरोबर त्यांचे जीना यांच्याबद्दलचे ’मवाळ’ विचार/ वक्तव्य हे राजकीय डावपेचाचा भाग नसून खरच प्रामाणीक मत असावे असेही वाटते.
आणि त्याचेच एक निदर्शक म्हणजे त्यांनी पुस्तकात खलील जिब्रान, चीनी तत्ववेत्ता कन्फ्युशियस, बर्ट्रांड रसेल आणि साहीर लुधियानवी पासून स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरु, महर्षी अरविंद योगी आणि महात्मा गांधींपर्यंत अनेकांचे विचार, वचने आणी ओळी जागोजागी वापरल्या आहेत.
उदा: खालील महात्मा गांधींच्या काही ओळी ह्या एका प्रकरणाची सुरुवात म्हणून वापरल्या आहेत.
==================================================
सात सामाजिक पापे
१. तत्वशून्य राजकारण
२. नैतिकतेशिवाय व्यापार
३. कामाशिवाय मिळालेली संपत्ती
४. चारित्र्यहीन शिक्षण
५. मानवताविरहित शिक्षण
६. अविवेकी उपभोग
७. त्यागाशिवाय भक्ती
~ महात्मा गांधी
<span class="App
le-style-span” style=”font-size:me
dium;”>(एल के अडवाणी यांच्या ’देश माझा मी देशाचा’ ह्या आत्मचरित्रातून, पान क्र. ४८०)
le-style-span” style=”font-size:me
dium;”>(एल के अडवाणी यांच्या ’देश माझा मी देशाचा’ ह्या आत्मचरित्रातून, पान क्र. ४८०)
==================================================
त्याप्रमाणेच एके ठिकाणी वापरलेले संस्क्रुत वचन अडवाणींची प्रतिमा आणि त्यांचे विचार ह्याविषयीही बरेच काही सांगून जाते
॥ एकं सत विप्रः वसुधा वदन्ति ॥
अर्थात – सत्य एकमेव असते, जाणकार त्याचे वेगवेगळे विश्लेषण करतात…
(पान क्र. – ८४३)
~ कौस्तुभ
????..?????? ???? ????? ???. ?? ?? ?? ???? ????? ???? ?? ???????? ????? ??????? ??????? ????? ??????? ??? ????? ?? ????????????? ???? ????? ??? ?????? ???????? ??????? ?????????????? ???? ????? ??? ?????? ???? ???. ?? ????????? ??????????? ??? ??????? ???????? ???? ??????? ????? ??? ??? ???? ????.
LikeLike
????..?????? ???? ????? ???. ?? ?? ?? ???? ????? ???? ?? ???????? ????? ??????? ??????? ????? ??????? ??? ????? ?? ????????????? ???? ????? ??? ?????? ???????? ??????? ?????????????? ???? ????? ??? ?????? ???? ???. ?? ????????? ??????????? ??? ??????? ???????? ???? ??????? ????? ??? ??? ???? ????.
LikeLike