निरंजन टकले यांचे सावरकांबद्दलचे एक सनसनाटी भाषण मी काही आठवड्यापूर्वी इथे पोस्ट केले होते. आता त्यांचे अजून एक भाषण नुकतेच माझ्या नजरेस पडले.
“सावरकर हे बकरीचा वाघ केलेलं व्यक्तिमत्व” असे वादग्रस्त title असलेले हे निरंजन टकले यांचे भाषण डॉ संग्राम पाटील यांनी त्यांच्या youtube चॅनेल वर नुकतेच प्रसिद्ध केले आहे.
हे पूर्ण सत्य आहे किंवा अजिबात सत्य नाही, असा कुठलाच दावा मी करणार नाही. परंतु, अंधपणे उदोउदो करणे, दैवी गुण बहाल करणे हे देखील मला पटत नाही. सांगितलेल्या गोष्टी तर्कसंगत आहेत का हे मी बघायचा प्रयत्न करतो.
तुम्हाला हे भाषण तर्कसंगत वाटतंय का हे तुम्ही तपासा. बाकी टकले यांनी नमूद केलेले त्यांचे पुस्तक जेव्हा येईल तेव्हा ते नक्की वाचेन.

Leave a comment