हा weekend अचानकच Art ला dedicate केल्यासारखं झालं…
म्हणजे काल शनिवारी “पुनःश्च हनिमून” हे नाटक पाहिले. आणि आज रविवारी अचानकच एका तबला concert ला जायचा योग आला!

ज्या मैत्रिणीनी मला “पुनःश्च हनिमून” नाटक सुचवलं तिचा मेसेज असा होताः “मी हे नाटक पहिल्याच दिवशी पाहिलं. थोडं abstract आहे…प्रायोगिक म्हणता येईल असं. पण तुला आवडेल असं आहे”.
आता ही तिरकस टीका आहे का compliment आहे ते समजणं अवघड आहे. पण तरी कलाकार बघून आणि दिवस/वेळ जमून येत असल्यामुळे नाटक बघायचं ठरवलं.
नाटक पाहिल्यावर वर सांगितलेलं वर्णन अचूक आहे असं वाटलं…फक्तं शेवटचं वाक्य सोडून. म्हणजे नाटक तसं तुकड्या-तुकड्यात बरं वाटलं, पण एकूण प्रयोग म्हणून गोंधळलेलं वाटलं.
संदेश कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांचा अभिनय सुरेख आहे. ह्या खऱ्या नवरा-बायकोमधील chemistry रंगमंचावरही ठळकपणे जाणवते. अमृता सुभाषला बघून मला काही आठवणी नाही येऊ द्यायच्या ठरवलं तरी आल्याच! विशेषतः तो जरा अरसिक, मख्ख आणि ती प्रचंड उत्साही आणि bubbly हे लगेच relatable वाटलं! अमृता वयाने बरीच मोठी आहे असा माझा समज होता, पण सहज Google केल्यावर समजलं की तीदेखील १९७९ ची आहे…योगायोग?!
संदेश कुलकर्णीचं दिग्दर्शनही छान आहे. पण लेखनात (जे पुन्हा संदेशचंच) गोंधळ झाला आहे. म्हणजे बऱ्याच themes/छटा अकत्र केल्यामुळे कशालाच संपूर्ण न्याय मिळाला नाहीये असं वाटतं…आणि म्हणून तुकड्या-तुकड्यात छान पण एकसंध केल्यावर कुठेतरी कमी, अपूर्ण असं वाटतं. शिवाय स्थळ-काळ यांचा खेळ आहे असे नाटकाच्या सुरूवातीला जे सांगितलं जातं त्या खेळाचा अतिरेक झालाय असं वाटतं. शेवटही अधांतरी आणि तडकाफडकी केल्यासारखं वाटतं. त्यामुळे नाटक average to below average या गटात येऊन मोडतं.
माझ्या एका तबलावादक मित्रानी मला आज रविवारी होणाऱ्या तबलावादनाच्या एका private concert बद्दल सांगितले. माझा मित्र तेलुगू असून हैद्राबादमध्ये राहतो, पण तिथल्या कुठल्याशा Art Group मधे त्याला ह्या कार्यक्रमाबद्दल समजले आणि पुण्यातला कार्यक्रम म्हणून मला पाठवले आणि जमलं तर नक्की जा असे सांगितलं.

कार्यक्रम विनामूल्य होता, आणि कुठेही जाहिरात केली नव्हती. कालच बायकोबरोबर नाटक पाहिल्याने आज मित्राबरोबर जायला काहीच problem नव्हता. म्हणून माझ्या अजून एका तबलावादक मित्राबरोबर थोड्यावेळासाठी म्हणून गेलो. पण कार्यक्रम इतका अप्रतिम होता की ६-९ असा पूर्ण वेळ तिथेच थांबलो!
Value for money बद्दल आपण बोलतो…पण कधी कधी सहजपणे फुकट असलेला एखादा कार्यक्रम प्रचंड आनंददायी असतो! “फुकट ते पौष्टीक” हे कधीकधी खरंच खरं असतं. कालचं नाटक ₹४०० एवढं worth होतं का हा प्रश्नं पडला होता. ₹४०० मध्ये एखादं खूप चांगलं पुस्तक येऊ शकतं. पण आजचा कार्यक्रम पाहिल्यावर वाटलं की ह्याला ₹४०० अगदी सहज दिले असते. गुरूंचे स्मरण म्हणून केलेला कार्यक्रम…सर्वांसाठी मोफत…तरीही कलाकारांनी अत्यंत तन्मयतेनी सादर केला. व्यावसायिक नाटक, तितक्याच मनापासून कलाकारांनी सादर केलं…पण काही तरी बिनसलं…
कला या क्षेत्राचं असंच असतं. एक जमून आला नाही म्हणून ₹४०० जास्त वाटतात, तर दुसरा फुकट असूनही जमून आल्यामुळे मौल्यवान वाटतो. पण शेवटी वाटतं की असं ₹४००-५०० मोल करणं तरी बरोबर आहे का?
Art या विषयात price आणि value यांत प्रचंड अंतर असू शकतं. त्यामुळे किंमतीवर मूल्य ठरवू नये!

Leave a comment