निरंजन टकले यांच्याबद्दल मी नुकतेच एका ब्लॉग मध्ये लिहिले. त्यांचे सावरकरांबद्दलचे विचार इ.
नुकताच त्यांच्या youtube चॅनेलवर एका पूर्वाश्रमीच्या शाखेतल्या स्वयंसेवकांची (जो नंतर शहाणा झाला आणि शाखेपासून विभक्त झाला) मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. ती सर्वांनी आवर्जून पहावी /ऐकावी म्हणून इथे प्रसिद्ध करत आहेत. यातल्या बहुतेक गोष्टी मला आधीपासून माहिती आहेत आणि जवळून पहिल्या आहेत. मी स्वतः कधी शाखेत त्या अर्थाने नियमित गेलो नाही तरी मला पुरेशी माहिती आहे…माझे काही जवळचे नातेवाईक आणि मित्र (आता ते जवळचे राहिले नाहीत) पूर्णपणे संघाला वाहून घेतलेले आहेत. मी स्वतः काही काळ शाखेत खेळायला जायचो, किंवा तिथेच आजूबाजूला खेळायचो तेव्हा शाखेचे वातावरण अगदी जवळून बघितले आहेत.
त्यामुळेच मी ह्या व्हिडिओमधल्या सगळ्या गोष्टींशी relate करू शकलो.
प्रत्येक भारतीयाने आवर्जून पहावा /ऐकावा अशी ही मुलाखत आहे. नक्की बघा…

Leave a comment